महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेन्सेक्स घसरणीत, निफ्टी मात्र सावरली

06:49 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आशिया- युरोप बाजारात नकारात्मक  कल : भारतीय बाजाराचा बाजारमूल्यात नवा विक्रम

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी बाजार बंद राहिला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी भारतीय बाजारात सेन्सेक्स घसरणीसह तर निफ्टी मात्र तेजीसह बंद झाल्याचे दिसून आले. यामध्ये आशिया व युरोपीयन बाजारांमधील नकारात्मक कल राहिला होता. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे मंगळवारी मोठ्या प्रमाणात चढउताराची स्थिती राहिली होती.

मुख्य कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स  दिवसअखेर 52.63 अंकांनी प्रभावीत होत  निर्देशांक 0.07 टक्क्यांसह निर्देशांक 73,953.31 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 27.05 अंकांसोबत निर्देशांक 0.12 टक्क्यांनी वधारुन 22,529.05 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये नेस्ले, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग घसरणीत बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, पॉवरग्रिड कॉर्प, टेक महिंद्रा आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग हे वधारुन बंद झाले.

जागतिक बाजारांची स्थिती

आशियामधील बाजारांमध्ये सियोल, टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँगमधील बाजारात घसरण राहिली. तर युरोपमधील बाजारात नकारात्मक कल राहिला होता. अमेरिकन बाजार सोमवारी चढउतार करत बंद झाला आहे.

भारतीय बाजार प्रथमच 5 ट्रिलियन डॉलरच्या घरात

बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या बाजारमूल्याने मंगळवारच्या सत्रात नवीन विक्रम नोंदवला आहे. यामध्ये बाजारात प्रथमच कंपन्यांचे बाजारमूल्य 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले. बीएसईच्या वेबसाइटनुसार, एक्स्चेंजमध्ये लिस्टेड सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य 21 मे रोजी 412 लाख कोटी रुपयांच्यावर गेले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून, बाजारमूल्यात 633 अब्ज डॉलरहून अधिक वाढ झाली आहे.

सध्या जगभरातील केवळ 4 देशांच्या शेअर बाजाराचे बाजारमूल्य 5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या देशांमध्ये अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगचा समावेश आहे. अमेरिका 55.65 ट्रिलियन डॉलर बाजारमूल्यासह आघाडीवर आहे. त्यानंतर चीन (9.4 ट्रिलियन डॉलर), जपान (6.42 ट्रिलियन डॉलर) आणि हाँगकाँग (5.47 ट्रिलियन डॉलर) यांचा क्रमांक लागतो.

आगामी काळात....

लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल हे जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहेत. यामुळे आगामी काळात बाजाराची दिशा कोणता कल घेणार हे पहावे लागणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article