महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेन्सेक्सची 422 अंकांची पडझड

07:00 AM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अदानी समूहाचे समभाग 23 टक्क्यांनी नुकसानीत : निफ्टीही घसरणीसह बंद

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. अमेरिकेतील एका न्यायालयाने उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर फसवणुकीच्या आरोपासह दोषी ठरविल्याच्या बातमीमुळे भारतीय बाजारात नकारात्मक वातावरण गुरुवारी राहिले होते. दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनीही विक्री सुरु ठेवल्याचा फटका भारतीय बाजाराला बसला आहे. जागतिक बाजारांमध्येही मिळता-जुळता कल राहिल्याचा प्रभावही भारतीय बाजारावर झाला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 422.59 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.54 टक्क्यांच्या घसरणीसह 77,155.79 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 168.60 अंकांच्या नुकसानीतसोबत निर्देशांक 23,349.90 वर बंद झाला आहे.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने गुरुवारी अदानी पोटर्स, एनटीपीसी, स्टेट बँक, आयटीसी आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग घसरणीत पहिल्या पाच मध्ये राहिले होते. यासह बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती सुझुकी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा,  लार्सन अॅण्ड टुब्रो, जेएसडब्लू स्टील, नेस्ले इंडिया, सनफार्मा, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँक यांचे समभागही घसरणीत राहिले आहेत. दुसऱ्या बाजूला 30 पैकी 10 समभाग हे तेजीत राहिले आहेत. यामध्ये पॉवरग्रिड कॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीत पहिल्या पाचमध्ये राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टीसीएस, इन्फोसिस, कोटक बँक, अॅक्सिस बँक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.

या क्षेत्रांची कामगिरी

विभागीय कामगिरीचा आलेख पाहिल्यास यामध्ये रियल्टी आणि आयटी या क्षेत्रांची कामगिरी सकारात्मक झाली आहे. तर ऊर्जा, धातू आणि एफएमसीजी क्षेत्रांमध्ये मरगळ राहिली होते.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article