For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्सचा दबदबा

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्सचा दबदबा
Advertisement

शेवटच्या तासात शेअर बाजार चांगल्या तेजीसोबत बंद

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात व अंतिम सत्रात गुरुवारी बीएसई सेन्सेक्स हा शेवटच्या तासात मजबूत कामगिरी करत एक  भक्कम स्थिती निर्माण करत बाजार बंद झाल्याचे दिसून आले आहे. यासोबत निफ्टीचा निर्देशांकही वधारुन बंद झाला आहे. चालू आठवड्यात सोमवारी होळीनिमित्त बाजार बंद राहिला होता. तसेच आज शुक्रवारीही गुडफ्रायडे निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहे. यामुळे गुरुवार हाच बाजाराचा शेवटचा दिवस राहिला. शेअर बाजार गुरुवारी दुपारी 2.40 वाजात विक्री करणाऱ्या समभागांची गती काहीशी कमी झाली व यामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांनी आपली उच्चांकी कामगिरी प्राप्त केल्याचे दिसून आले.

Advertisement

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 655.04 अंकांनी वधारुन निर्देशांक 73,651.35 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 203.25 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 22,326.90 वर बंद झाला आहे. या दरम्यान निफ्टीमध्ये सर्वाधिक तेजीत राहणाऱ्या क्षेत्रांमध्ये बँक, वाहन, आर्थिक सर्व्हिसमधील कंपन्या, एफएमसीजी आणि आयटी या क्षेत्रांनी मजबूत कामगिरी गुरुवारी केल्याचे दिसून आले. तर यामध्ये 4 क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रांमध्ये मजबूत स्थिती राहिली होती. दिग्गज कंपन्यांमध्ये सर्वाधिक तेजीत ग्रासिम कंपनी राहिली आहे. यासोबतच बजाज फिनसर्व्ह, हिरोमोटोकॉर्प, बजाज फायनान्स आणि आयशर मोर्ट्स यांचे समभाग हे तेजीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये सर्वाधिक घसरणीत श्रीराम फायनान्स, अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, टेक महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग राहिले आहेत. चालू महिन्यातील व चालू आर्थिक वर्षातील गुरुवारचे सत्र हे अंतिम सत्र म्हणून शेअर बाजारात नेंद झाली आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

? बजाज फिनसर्व्ह              1643

? ग्रासिम               2287

? हिरो मोटोकॉर्प  4722

? बजाज फायनान्स             7245

? आयशर मोटर्स  4019

? एसबीआय          752

? पॉवरग्रिड कॉर्प  276

? ओएनजीसी        268

? अदानी एंटरप्रायझेस        3197

? सिप्ला  1496

? डिव्हीस लॅब्ज    3445

? नेस्ले    2622

? महिंद्रा आणि महिंद्रा         1921

? टाटा स्टील         155

? अपोलो हॉस्पिटल             6356

? डॉ. रे•िज लॅब्ज              6157

? विप्रो    480

? लार्सन टुब्रो         3763

? टाटा मोटर्स        992

? अदानी पोर्टस    1341

? अल्ट्राटेक सिमेंट              9749

? इंडसइंड बँक    1553

? एनटीपीसी         335

? टायटन               3801

? एचडीएफसी लाइफ         633

? कोल इंडिया      434

? सन फार्मा          1620

? इन्फोसिस          1498

? टीसीएस             3876

? आयसीआयसीआय          1093

? मारुती सुझुकी   12600

? एशियन पेंटस्    2846

? कोटक महिंद्रा   1785

? एचडीएफसी बँक             1447

? हिंडाल्को           560

? भारती एअरटेल 1228

? आयटीसी           428

समभाग घसरलेल्या कंपन्या

? श्रीराम फायनान्स             2359

? अॅक्सिस बँक     1047

? रिलायन्स           2971

? टेक महिंद्रा        1248

Advertisement
Tags :

.