सेन्सेक्सने प्रथमच 81 हजारांचा टप्पा ओलांडला
आयटीचे समभाग नव्या उंचीवर : सलग चौथ्या सत्रात तेजीचा प्रवास कायम
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवड्यातील गुरुवारी व सलग चौथ्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे दिसून आले. यामध्ये गुरुवारी बाजारात सुरुवातीच्या घसरणीतून सावरत बाजाराने तेजी पकडली. विविध कंपन्यांपैकी आयटी क्षेत्रातील समभागांच्या कामगिरीमुळे बीएसई सेन्सेक्सने प्रथमच तब्बल 81 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दुसऱ्या बाजूला निफ्टीनेही 24,800 ची पातळी गाठली आहे.
मुख्य कंपन्यांच्या सकारात्मक कामगिरीमुळे भारतीय बाजारात गुरुवारी दिवसअखेर सेन्सेक्स 626.91 अंकांच्या भक्कम स्थितीसह निर्देशांक 81,343.46 वर नवा विक्रम नेंदवत बंद झाला आहे. दिवसभरात सेन्सेक्स 80,390.37 ते 81,522.55 च्या दरम्यान कार्यरत राहिला होता. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 187.85 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 24,800.85 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे समभाग पहिल्या पाचमध्ये तेजीत राहिले. यासह हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक, एचसीएल टेक, कोटक बँक, भारती एअरटेल, टायटन, सनफार्मा, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा मोर्ट्स, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये 30 मधील 8 समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. यात एशियन पेन्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स आणि टाटा स्टील यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले. तर पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग हे मात्र घसरणीसह बंद झाले. विविध घडामोडींचा मागोवा घेतल्यास यामध्ये गुरुवारी आयटीच्या समभागांनी नवी उंची प्राप्त केली आहे. तसेच रुपया कमकुवत आणि जून तिमाहीमधील देशातील मुख्य आयटी कंपन्यांची सकारात्मक कामगिरी यामुळे बाजाराला बळ मिळाल्याचे दिसून आले. या सकारात्मक स्थितीमुळे बाजारात गुंतवणूकादारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एलटीआय माइंट्री 5756
- टीसीएस 4315
- ओएनजीसी 331
- बजाज फिनसर्व्ह 1651
- विप्रो 573
- एसबीआय लाइफ 1659
- महिंद्रा आणि महिंद्रा 2819
- श्रीराम फायनान्स 2867
- एचयुएल 2738
- इन्फोसिस 1758
- एचसीएल टेक 1594
- टेक महिंद्रा 1539
- एसबीआय 893
- टाटा कन्झु. 1193
- कोटक महिंद्रा 1826
- भारती एअरटेल 1483
- अपोलो हॉस्पिटल 6520
- आयटीसी 470
- सनफार्मा 1594
- टायटन 3262
- इंडसइंड बँक 1456
- नेस्ले 2627
- बजाज फायनान्स 7110
- बीपीसीएल 318
- रिलायन्स 3173
- लार्सन टुब्रो 3656
- आयशर मोटर्स 4941
- अॅक्सिस बँक 1309
- एचडीएफसी लाइफ 648
- टाटा मोटर्स 1024
- डॉ. रेड्डीज लॅब्ज 6667
- डिव्हीस लॅब्ज 4584
- ब्रिटानिया 5871
- मारुती सुझुकी 12644
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एशियन पेंटस् 2931
- कोल इंडिया 505
- हिरो मोटोकॉर्प 5502
- ग्रासिम 2791
- बजाज ऑटो 9626
- एनटीपीसी 377
- अदानी एंटरप्रायझेस 3092