महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सेन्सेक्सने 74 हजाराची पातळी ओलांडली

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 486 अंकांनी तेजीत : फार्मा कंपन्या नफ्यात

Advertisement

मुंबई : गुरुवारी भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा चांगल्या तेजीसोबत बंद झालेला पाहायला मिळाला. सेन्सेक्स निर्देशांक 486 अंकांनी वधारत बंद झाला असून फार्मा आणि ऑटो निर्देशांकांनी बाजाराला तेजी राखत मजबुत आधार दिला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 486 अंकांनी वधारत 74,339 अंकांवर बंद झाला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 168 अंकांच्या तेजीसमवेत 22570 अंकांवर बंद झाला. शेअरबाजारात गुरुवारी दिवसभरातल्या सत्रात अधुनमधून चढ-उताराचे वातावरण होते. बाजारात सत्रात एकावेळी सेन्सेक्सने 700 अंकांपर्यंत तेजी अनुभवली होती. निफ्टीनेही 22600 चा स्तर गाठला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर निर्बंध लादल्याने यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत व्यवहार करत होते. पण इतर बँकांचे समभाग मात्र तेजीत होते. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक यांचे समभाग मजबूत कामगिरी करत होते.

Advertisement

शेअरबाजारात निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास फार्मा आणि ऑटो निर्देशांक चमकताना दिसले. फार्मा आणि ऑटो अनुक्रमे 1.56 टक्के, 1.27 टक्के वधारत बंद झाले. निफ्टीतील सर्व निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. शेअरबाजारात तेजी राखण्यात अॅक्सिस बँक, एसबीआय, डॉक्टर रे•िज लॅब्ज, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले इंडिया, हिरो मोटोकॉर्प आणि सनफार्मा यांचा समावेश होता. तर दुसऱ्या बाजुला कोटक बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय लाइफ, टायटन, बजाज फायनान्स आणि टाटा कंझ्युमर यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले. मल्टीबॅगर समभागांचा विचार केल्यास एचसीएल टेक, ओएनजीसी, टीसीएस, लार्सन टुब्रो व बीएचइएल यांच्यासह इन्फोसिस, विप्रो यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. अदानी समुहातील 10 लिस्टेड कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या समभागात घसरण पाहायला मिळाली. एनडीटीव्हीचे समभाग 6 टक्के इतके दमदार वाढले हेते.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article