For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोटक बँक 400 अभियंत्यांची करणार नियुक्ती

07:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोटक बँक 400 अभियंत्यांची करणार नियुक्ती
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

कोटक महिंद्रा बँक दरवर्षी सुमारे 400 अभियंत्यांची भरती करणार आहे.  आयटी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे आरबीआयने बँकेच्या ऑनलाइन चॅनेलद्वारे नवीन क्रेडिट कार्ड आणि खाती उघडण्यास बंदी घातली आहे. बँकेला अभियंत्यांची नियुक्ती करून आयटी पायाभूत सुविधा मजबूत करायच्या आहेत. बँकेचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मिलिंद नागनूर म्हणाले की, बँकेने गेल्या दोन वर्षांत 500 हून अधिक अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. बँकेचे अध्यक्ष उदय कोटक यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने सदरची नव्याने उमेदवारांची भरती केली आहे. गुगल आणि अॅमेझॉन तसेच पेटीएम आणि फोनपे या सारख्या कंपन्यांमधून त्यांना घेतले गेले आहे. अनुभवी नागनूर आणि भावनीश लठिया यांची बँकेत नियुक्ती झाली आहे. नागनूर हे कोटकचे सर्वात अनुभवी भरती झालेले उमेदवार आहेत. त्यांच्यासोबत ग्राहक अनुभव प्रमुख भावनीश लठिया यांची नियुक्ती झाली. लठिया यांनी जवळपास दोन दशके अॅमेझॉनमध्ये अनुभव घेतला आहे.

तंत्रज्ञान सुधारणार

Advertisement

मजबूत आयटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावात बँकेची कोअर बँकिंग प्रणाली आणि तिची ऑनलाइन आणि डिजिटल बँकिंग प्रणाली गेल्या दोन वर्षांपासून वारंवार लडखडत आहे. तांत्रिक प्रणालीचा अभाव असल्याने बँकेला याबाबत रिझर्व्ह बँकेने सुधारणा करण्याचे आवाहन केले होते. याचीच दखल घेत वर सुचवल्याप्रमाणे 500 अभियंत्यांना पाचारण करण्यात आले आहे. देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी खासगी क्षेत्रातील बँक म्हणून कोटक बँकेचा उल्लेख होतो. 31 मार्चला संपलेल्या वर्षात बँकेने तंत्रज्ञान विकासासाठी 17 अब्ज रुपयांचा खर्च केला असल्याचे सांगितले जात आहे.

 उणीवा दूर करणार

बँकेच्या बाह्य लेखापरीक्षणानंतर लादलेल्या निर्बंधांचा आढावा घेतला जाईल किंवा बँकेला बाह्य लेखापरीक्षणासाठी आरबीआयची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. आरबीआयने तपासणी आणि बाह्य लेखापरीक्षणादरम्यान निदर्शनास आणलेल्या सर्व उणीवा देखील बँकेला दुरुस्त कराव्या लागणार आहेत.

Advertisement
Tags :

.