For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाजारात अल्पशा तेजीसोबत सेन्सेक्स बंद

06:21 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाजारात अल्पशा तेजीसोबत सेन्सेक्स बंद
Advertisement

निफ्टी मात्र 33 अंकांनी घसरणीत, आयटी कंपन्या तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात निफ्टी काहीशा घसरणीसोबत बंद झाला होता. सेन्सेक्स मात्र 17 अंकांनी तेजीत होता तर निफ्टी 33 अंकांनी घसरणीत राहिला होता. आयटी कंपन्यांचे समभाग सोमवारी तेजीत राहिले होते.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 17 अंकांनी वधारत 73,895 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकदेखील 33 अंकांनी घसरत 22442 अंकांवर बंद झाला. कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, एचयुएल आणि ब्रिटानिया यांचे समभाग तेजीत पाहायला मिळाले. तर टायटन, अदानी एंटरप्राइजेस, बीपीसीएल आणि कोल इंडिया यांचे समभाग मात्र मोठ्या घसरणीसह बंद झाले.

सोमवारी दिवसभरामध्ये शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला. एकावेळी सेन्सेक्स निर्देशांक 300 अंकांनी वधारत व्यवहार करत होता. कमकुवत नफ्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर टायटन कंपनीचे समभाग सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिले होते. कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, विप्रो, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंट्स यांचे समभाग तेजीसोबत व्यवहार करत होते. ओएनजीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, लार्सन टूब्रो आणि बीएसई लिमिटेड यांचे समभाग घसरणीत होते. गौतम अदानी समूहातील 10 लिस्टेड कंपन्यांपैकी सर्वच्या सर्व कंपन्यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले. मल्टीबेगर श्रेणीतील आयटीसी लिमिटेड, बंधन बँक, कजारिया सिरॅमिक्स, बीसीएल इंडस्ट्रीज, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल, साउथ इंडियन बँक, गेल, स्पाइसजेट, एलआयसी, पेटीएम आणि पंजाब नॅशनल बँक यांचे समभाग तोट्यासह बंद झाले. सोमवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी मात्र तेजी राखून ठेवली होती. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस या निर्देशांकांमध्ये घसरण होती.

Advertisement
Tags :

.