दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स विक्रमी टप्प्यावर
सेन्सेक्स 77,301 वर मजबूत : निफ्टीमध्येही चमक : जागतिक पातळीवरील प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात तेजीची नोंद राहिली आहे. यामध्ये चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी सेन्सेक्सने विक्रमी टप्पा प्राप्त केला आहे. यामध्ये प्रामुख्याने जागतिक बाजारांमध्ये टेक्निकल कंपन्या आणि खासगी बँका यांच्या कामगिरीने सेन्सेक्स व निफ्टी यांची चमक राहिली. याचा लाभ गुंतवणूकदारांना घेण्यास मोठी मदत मिळाली आहे.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 0.40 टक्क्यांसोबत 308.37 अंकांनी वधारुन निर्देशांक 77,301.14 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 92.30 अंकांनी वधारुन निर्देशांक 23,557.90 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये मंगळवारी पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.17 टक्क्यांनी वधारले आहेत. तर विप्रो, टायटन, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचे समभाग हे 2.14 टक्क्यांनी नुसानीत राहिले आहेत. यासह टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोर्ट्स, आयटीसी, टीसीएस, बजाज फायनान्स आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत.
देशातील गुंतवणूकदारांनी जूनमध्ये आतापर्यंत 178.29 अब्ज रुपयांच्या समभागांची खरेदी झाली आहे. यामुळे बाजारात दोन आठवड्याच्या अगोदर निवडणूक निकाल समोर आल्यानंतर घसरणीमधून उभारण्यास मदत मिळाली आहे. यासह आयटी कंपन्या आणि खासगी बँकांच्या समभागात तेजी राहिली आहे. यामुळे बाजाराला उभारी मिळाली.
या दरम्यान फिच रेटिंग्सने कझ्युमर खर्चात सुधारणा आणि गुंतवणुकीमध्ये होणारी वाढ याचा दाखला देत मंगळवारी चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास आणखीन मजबूत झाला. शेअर बाजारातील उपलब्ध माहितीनुसार विदेशी संस्थाकडून शुक्रवारी 2,175.86 कोटी इक्विटीची खरेदी झाली आहे.
जागतिक बाजारांमध्ये आशियातील दक्षिण कोरियाचा सियोल, जपानचा टोकीओs आणि चीनचा शांघाय हे लाभात राहिले. तर हाँगकाँगचा बाजार प्रभावीत झाला आहे. युरोपीयन बाजारात मात्र काहीशी वाढ राहिली.