महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सेन्सेक्स सलग दुसऱ्या सत्रात 74 हजार पार

07:00 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निफ्टीचा विक्रम तोडत नव्या टप्प्यावर प्रवास कायम

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात सलग दुसऱ्यांदा सेन्सेक्सने 74हजाराचा टप्पा प्राप्त केला आहे. दुसऱ्या बाजूलार राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांनेही नवी उंची प्राप्त विक्रम प्राप्त केला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स वधारुन बंद झाला. दिवसभरातील कामगिरीत सलग दुसऱ्यांदा सेन्सेक्स 74 हजारांवर पोहोचल्याचे दिसून आले. दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 33.40 अंकांनी वधारुन निर्देशांक 74,119.39 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर  19.50 अंकांच्या मजबुतीसह निर्देशांक 22,493.55 वर बंद झाला आहे.  बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्या निर्देशांकांमध्ये काहीशी घसरण राहिली होती, परंतु दोन्हीची कामगिरी ही अव्वल अंकांवर राहिल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान लॉर्ज कॅपचे समभाग हे दबावात राहिले आहेत. मात्र तेजी प्राप्त करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुरुवारी टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोर्ट्स, बजाज फायनान्स, आयटीसी, एशियन पेन्ट्स, नेस्ले इंडिया आणि टीसीएस यांचे समभाग हे जवळपास 1 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत.

निफ्टीमधील कंपन्यांची कामगिरी पाहिल्यास यामध्ये टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड, टाटा स्टील , बजाज ऑटो , युपीएल आणि जेएसडब्लू स्टील यांच्या समभागांचा समावेश आहे. बाजारात घसरणीत राहणाऱ्या कंपन्यांमध्ये गुरुवारी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बीपीसीएल, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक आणि एलटीआय माइंडट्री यांचा समावेश राहिला आहे. भारतीय भांडवली बाजारात दुसऱ्या दिवशी सलगची मजबूत तेजी प्राप्त करण्यात आली आहे. यामध्ये जागतिक बाजारातील कामगिरी आणि विदेशी फंड इनफ्लो यांच्या दरम्यान धातू व दररोज वापरात असणाऱ्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्याकंपन्यांच्या समभागांमधील तेजीचा लाभ सेन्सेक्स व निफ्टी यांना झाल्याचे दिसून आले. यासह डिसेंबर तिमाहीमधील जीडीपी वाढीसाठी सरकारी आकडे सादर करण्यात आले होते. यामध्ये भारताचा विकासदर हा 8.4 टक्क्यांवर राहणार असल्याचे भाकीत अर्थशास्त्रज्ञांनी केले असल्याने त्याचे पडसाद हे गुरुवारी बाजारात राहिल्याचे दिसून आले. आजच्या बाजाराकडे गुंतवणूकदारांची नजर सप्ताहातील अंतिम दिवशी मागील दोन दिवस प्राप्त केलेला नवा विक्रम कायम राहणार का तो खंडित होणार हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article