शांघाय मास्टर्स स्पर्धेत सिनेर विजेता
वृत्तसंस्था/ शांघाय
एटीपी टूरवरील येथे रविवारी झालेल्या शांघाय मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या टॉप सिडेड जेनिक सिनेरने सर्बियाच्या माजी टॉप सिडेड जोकोविचचा पराभव करत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सिनेरने जोकोविचचा 7-6 (7-4), 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या सामन्यात सिनेरने 8 बिनतोड सर्व्हिसची तसेच 22 विजयी फटक्यांची नोंद केली. पण जोकोविचने या लढतीत 4 बिनतोड सर्व्हिसची आणि 12 विजयी फटक्यांची नोंद केली. जोकोविचने आतापर्यंत 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत.
या स्पर्धेत महिलांच्या विभागात द्वितीय मानांकित आर्यना साबालेंकाने अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत साबालेंकाने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात साबालेंकाने गॉफचा 1-6, 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. आता साबालेंका आणि चीनची क्विनवेन यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. क्विनवेनने उपांत्य फेरीच्या सामन्यात झिनयुचा 6-3, 6-4 असा पराभव केला.