कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

12:53 PM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पेडणे : ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे काल शुक्रवारी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे. शनिवारी 7 रोजी सकाळी साडेनऊ वाजता जवाहर बाग स्मशानभूमी, ठाणे पश्चिम येथे अंतिम संस्कार होणार आहेत. रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या दाजींनी 50 वर्षांहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. आजोबा वासुदेवशास्त्राr पणशीकर यांचा हिंदू धर्मग्रंथ, परंपरा यांचा वारसा त्यांनी पुढे नेला. देशविदेशात सुमारे अडीच हजार व्याख्याने दिली. मराठा, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील लेखमालांबरोबरच सामना दैनिकात सलग 16 वर्षे त्यांनी लिहिलेल्या विविध लेखमाला हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा वैचारिक ठेवा आहे. महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता?, कथामृतम, कणिकनिती, शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित स्तोत्र गंगा (दोन भाग), अपरिचित रामायण (पाच भाग), गानसरस्वती किशोरी आमोणकर - आदिशक्तीचा धन्योद्गार अशा त्यांच्या विविध ग्रंथांच्या आजवर 30 हून अधिक आवृत्या निघाल्या आहेत. मोठे बंधू प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यासंपदा नाट्यासंस्थेचे व्यवस्थापक म्हणून दाजींचा मराठी साहित्य, संगीत, नाट्या, चित्रपट, क्षेत्रातल्या दिग्गज कलाकारांशी जवळून संबंध आला. महाराष्ट्राचा गेल्या 50 वर्षांचा सांस्कृतिक इतिहास ज्ञात असलेले एक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article