महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉ. सपना गायतोंडे यांना वरिष्ठ वैज्ञानिक पुरस्कार

12:12 PM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : शांतीनगर - फोंडा येथील रहिवासी आणि खांडोळे येथील सरकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक डॉ. सपना गायतोंडे यांना मायक्रोबायोलोजिस्ट सोसायटी इंडियातर्फे ज्येष्ठ वैज्ञानिक पुरस्काराने अलीकडेच सन्मानित करण्यात आले. मायक्रोबायोलोजिस्ट सोसायटी इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तामिळनाडू येथील भारतीसदन विद्यापीठात झालेल्या तीन दिवसीय ‘मायक्रोबायोलोजी संशोधन : सध्याची आव्हाने व भविष्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. गायतोंडे यांनी सहभाग घेतला होता. डॉ. सपना गायतोंडे यांना त्यांच्या संशोधनात्मक व अन्य कार्यासाठी सन्मानित करण्यात आले असून गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याही हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आयसीएआर-सीसीएआर आय, गोवा यांच्यातर्फेही त्यांना वरिष्ठ संशोधक शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article