महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वरिष्ठ पोलीस अधिकारी बेळगावात

12:00 PM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सण-उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी केल्या सूचना : गणेशोत्सव तयारीचा घेतला आढावा 

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी पोलीस दलाने आवश्यक तयारी करावी, अशी सूचना कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक आर. हितेंद्र यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. बुधवारी शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी गणेशोत्सव तयारीचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त कार्यालयात अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालकांना सलामी देण्यात आली. त्यानंतर झालेल्या बैठकीत बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस यांच्यासह आयुक्त कार्यक्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

गणेशोत्सव, श्री विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद बंदोबस्ताचा आढावा घेऊन अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालकांनी सण, उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी आवश्यक सूचना केल्या. यासंबंधी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन बंदोबस्तासंबंधी मार्गदर्शन केले आहे, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात बेळगावात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. उत्सवाचा काळ व श्री विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने तयारी सुरू केली असून पोलीस स्थानकनिहाय शांतता समितीच्या बैठका झाल्या आहेत. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तयारीचा आढावा घेतला आहे. दरम्यान, गुरुवारी वाहतूक व रस्ते सुरक्षा विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार बेळगावला येत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article