महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भाजपचे वरिष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन

06:27 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त

Advertisement

वृत्तसंस्था/ गुरुग्राम

Advertisement

मध्यप्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते प्रभात झा यांचे गुरुग्राम येथील रुग्णालयात निधन झाले आहे. मेदांता रुग्णालयात त्यांनी शुक्रवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. सुमारे महिन्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. यानंतर त्यांना भोपाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मग गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले होते.

झा यांच्यावर बिहारमधील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. झा हे मध्यप्रदेश भाजप अध्यक्ष, राज्यसभा खासदार तसेच भाजपचे राष्ट्रीय सचिव देखील राहिले आहेत. प्रभात झा हे मूळचे बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील हरिहरपूर गावचे रहिवासी होते. परंतु त्यांचे प्राथमिक तसेच उच्चशिक्षण मध्यप्रदेशात झाले होते. झा यांच्या निधनाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त  केले आहे. तसेच केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांनीही  झा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article