ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचे ८३ व्या वर्षी निधन
देब मुखर्जी हे दिग्दर्शक आयान मुखर्जीचे वडील
देब मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलीवूडमधील सेलिब्रिटींची उपस्थिती
मुंबई
होळी धुळवडीला बी टाऊनमध्ये धमाकेदार पार्टींचे आयोजन केले जाते. रंगांच्या या उत्सवात बॉलीवूडमधले कलाकार अगदी उत्साहात सामील होतात. अशा उत्सावाच्या दिवशी दिग्दर्शक आयान मुखर्जी यांच्या घरी मात्र दुखाचा डोंगर कोसळला. आयान मुखर्जी यांचे वडिल ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचे निधन झाले.
देब मुखर्जी (वय ८३) यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. मुखर्जी यांच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली. आयान मुखर्जी यांच्या पितृशोका सामील होण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक सेलब्रिटींनी उपस्थिती लावली. आयान मुखर्जी यांचे जवळचे मित्र रणबीर कपूर आणि आलिया भट, जया बच्चन, अनिल कपूर, ऋतिक रोशन, किरण राव, समील खान, करण जोहर यांच्यासह अनेक कलाकार श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते. देब मुखर्जी हे काजोल आणि तनिषा यांचे काका होत. तसेच राणी मुखर्जी आणि शरबाणी मुखर्जी याही देब मुखर्जी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.
देब मुखर्जी हे निर्माते- दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे सासरे होत. देब मुखर्जी यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली कन्या सुनिता या आशुतोष गोवारीकर यांच्या पत्नी आहेत. तर आयान मुखर्जी हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे आपत्य आहेत.