तुमच्या हक्काच्या माणसाला विधानसभेवर पाठवा
अपक्ष उमेदवार विशाल परब यांचे इन्सुलीवासियांना आवाहन
सावंतवाडी प्रतिनिधी
विशाल परब हा आपल्या हक्काचा माणूस आहे ही ओळख ठेवा आणि आपण सर्वजण एक आहोत आणि एकजुटीने राहून परिवर्तन घडवूया . आपल्या भागाचा विकास करूया. तुमच्या समस्या म्हणजे माझ्या समस्या आहेत आणि त्या मी सोडवणार. त्यासाठी मी चौवीस तास तुमच्या सोबत असेन.आपण मुंबईकर न होता जिल्ह्यात राहून तुमच्या घरातला माणूस असेन असे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी इन्सुली येथील प्रचारावेळी स्पष्ट केले.
अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी बांदा , इन्सुली भागात आपला प्रचार दौरा केला. यावेळी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इन्सुली गावात श्री विशाल परब यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विशाल परब यांनी आपला प्रचार झंझावात सुरू केला आहे . यावेळी त्यांच्यासोबत ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री परब म्हणाले मी माझ्या प्रचाराचा शुभारंभ काल केल्यानंतर आपण प्रत्येक गावागावात, घराघरात पोहोचत आहे. कारण, प्रत्येकाच्या मनात आपल्या हक्काचा माणूस हवा आहे आणि आता तुमच्या हक्काचा माणूस तुमच्याकडे आला आहे. त्यामुळे तुम्ही त्याला साथ द्या आणि महाराष्ट्र विधानसभेवर पाठवा आणि तुम्ही ते कार्य कराल याची मला खात्री आहे असे ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.