For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

चांगल्या नेतृत्वाला पुढे पाठवा ! राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट

11:45 AM Mar 11, 2024 IST | Abhijeet Khandekar
चांगल्या नेतृत्वाला पुढे पाठवा   राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट
CM Rajasthan Sachin Pilot

पाचगाव वार्ताहर

मतांचा योग्य वापर करून चांगल्या नेतृत्वाला पुढे पाठव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार समाजाला प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन राजस्थानचे माझी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

Advertisement

काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी येणाऱ्या काळात भंडारा उधळून काठी आणि घोंगडे घेऊन बदल घडवण्यासाठी बाहेर पडायचे आहे असे आवाहन त्यांनी धनगर समाजाला केले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी पुढील खासदारांचा निधी देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकामध्ये बबन रानगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे झाल्याचे सांगितले. आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या उत्तम राज्यकर्त्या होत्या. त्यांनी अन्याया विरुद्ध लोकांना न्याय मिळवून दिला तसेच उत्कृष्ट पद्धतीने राज्यकारभार केला असे सांगितले.

Advertisement

आमदार अमित देशमुख यांनी राज्यकर्ते जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे मत व्यक्त केले. आमदार विश्वजीत कदम यांनी बोलताना आमदार सतेज पाटील यांचा कोल्हापूर मधील काँग्रेसच्या विजयाचा पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रभर राबवू असे सांगितले.
धनगर समाजाच्या वतीने आमदार सतेज पाटील आणि मान्यवरांचा सत्कार घोंगडे काठी आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमासाठी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार पी एन पाटील, मालोजीराजे छत्रपती, राजू बाबा आवळे, बयाजी शेळके, यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.