क्रीडा विभागाची घोडदौड कायम
सुवर्णाक्षरांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर शिवाजी विद्यापीठाचे कोरले नाव
खेळाडूंना भत्त्यासह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
कोल्हापूर /अहिल्या परकाळे
शिवाजी विद्यापीठातील क्रीडा विभागातील खेळाडूंनी अलीकडे राज्य व राष्ट्रीय पातळीवर कास्य, सुवर्ण पदकाचा मान पटकावला आहे. खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात मिळवलेले यशाने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. खेळाडूंना विद्यापीठ प्रशासनाकडून दैनंदिन भत्त्यासह अन्य सुविधाही पुरवल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य खेळाडूंना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नसल्याने पूर्ण ताकदीनिशी आपआपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करता येते. विद्यापीठातील खेळाडूंची सुवर्णझेप विद्यापीठाच्या यशाची घोडदौड कायम ठेवणारी आहे.
क्रीडा अधिविभगा मार्फत दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त खाशाबा जाधव यांची प्रदर्शिनी भरवून क्रीडा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. चालू वर्षात 10,000 खेळाडू 46 खेळप्रकारात मध्ये सहभागी होत आहेत. आंतर विभागीय स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर , सांगली अणि सातारा तीन जिल्ह्यांमध्ये संलग्नित महाविद्यालयांच्या मदतीने करण्यात येत आहे. 1000 हून अधिक खेळाडू 66 खेळ प्रकार मध्ये आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच यावर्षी नेटबॉल महिला संघ या स्पर्धेत प्रथमच सहभागी होणार आहे. ऑक्टोबर झुंझुनु येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये कबड्डी पुरुष संघाने तृतीय क्रमांक मिळवून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.
विद्यापीठच्या श्रीधर निगडे व वैष्णवी पाटील , (रग्बी) , नंदिनी साळोखे( कुस्ती) शाहू माने ( नेमबाजी) प्रतीक पाटील ( साइक्लिंग ) या खेळाडूना छत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर विद्यापीठ नेहमी चांगल्या क्रीडा सुविधा खेळाडूना देण्याचा प्रयत्न करत असते त्याचाच एक भाग म्हणून आंतर राष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉलची तीन कोर्ट व बॅडमिंटनचे कोर्ट सुरू केले जाणार आहे. शिवकालीन युद्ध कलांचे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.
अनुष्का कुंभार हिची जागतिक जूनियर जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिप, अमेरिका स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. शिवाजी विद्यापीठाची खेळांडू पैलवान अमृता पुजारी हिने महिला महाराष्ट्र केसरीचे पद पटकावले. त्याचबरोबर अमृताची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 72 किलो वजनी गटात 23 वर्षाखालील जॉर्डन येथे झालेल्या आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता भारताचे नेतृत्व करून कांस्य पदक जिंकले आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रिदमिक जिम्नॅस्टिक्स चे प्रशिक्षण शिबिर दिनांक 15 ते 17 जून 2024 दरम्यान क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर हॉल शिवाजी विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आले आहे या रिदमिक जिम्नॅस्टिक शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सई खोंड, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले.
विद्यापीठातील क्रीडा विभागाला इतर खेळांची आत्याधुनिक खेळांची साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. खेळाडूंना प्रवासामध्ये खाण्यासाठी ड्रायफुडपासून पौष्टिक आहार दिला जातो. दैनंदिन फत्त्यात वाढ केल्याने खेळाडूंची आर्थिक कुचंबना होत नाही. तसेच खेळाडूंना प्रत्येक खेळाचे उत्कृष्ट प्रशिक्षण मिळत असल्याने आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी सुवर्णपदकाची कामगिरी केली जात आहे. महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात दुसऱ्या क्रमांकाची जनरल चॅपियनशिप मिळवून शिवाजी विद्यापीठाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. खेलो इंडियामध्ये शिवाजी विद्यापीठातील 25 खेळाडूंनी विविध पदके मिळवली आहेत.
खेळाडूंना ग्रेस गुणांची पर्वणी
विद्यापीठ प्रशासनाकडूनही अनेक सुविधा पुरवल्या जात असून परीक्षेच्या कालावधीत क्रीडा स्पर्धा सुरू असतील तर विद्यार्थ्यांना सूट देत यथावकाश खेळाडूंच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे खेळासह अभ्यासातही खेळाडू यश संपादन करीत आहेत. त्याला ग्रेस गुणांचे कवच असल्याने खेळाडूंची शैक्षणिक गुणवत्ताही वाढत आहे. विद्यापीठाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना वारंवार प्रोत्साहन देत आत्मविश्वास वाढवला जातो. खेळाडूंच्या सर्वांगिण विकासासाठी विद्यापीठ प्रशासन सर्वोत्परी प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास येते.
खेळाडू वसतिगृहाच्या कामाला वेग
खेळाडू वसतिगृहाच्या बांधकामाला वेग आला असून येत्या वर्षभरात बांधकाम पूर्ण होईल. या वसतिगृहात राहून पदवीपर्यंतचे शिक्षण आणि खेळाचा सराव करणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. विद्यापीठ परिसरात प्रत्येक खेळाचे ग्राऊंड असल्याने खेळाडूंनी प्रशिक्षनही मिळते. विद्यापीठ प्रशासन खेळाडूंच्या प्रगतिसाठी आतोनात प्रयत्न करीत असून, ऑलंपिक क्रीडा प्रकारात खेळाडूंनी शिवाजी विद्यापीठाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरावे, असा विद्यापीठाचा मानस आहे.
डॉ. शरद बनसोडे (संचालक, क्रीडा व शारिरीक शिक्षण विभाग)