महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फुटबॉलच्या सुवर्णासाठी सेनादलची लढत मणिपूरशी

11:15 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरूषांच्या फुटबॉल स्पर्धेतील अंतिम लढत सेनादल आणि मणिपूर यांच्यात होणार आहे. काल फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या उपान्त्य लढतीत केरळ आणि पंजाब यांना पराभूत व्हावे लागले. आता हे दोन्ही संघ ब्राँझपदकासाठी खेळतील. सकाळच्या सत्रात खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपान्त्य लढतीत सेनादलने केरळवर 4-2 असा विजय नोंदविला. पहिल्या सत्रात उभय संघ 1-1 अशा बरोबरीत खेळत होते. सेनादलसाठी राहुल रामकृष्णनने दोन तर बिकाश थापा व ख्रिस्टोफर कामीने प्रत्येकी एक गोल केला. केरळचे गोल जी. संजू व निझो गिल्बर्ट यांनी पॅनल्टीवर केले. दुसऱ्या उपान्त्य लढतीत मणिपूरने पंजाबचा 2-1 असा पराभव केला. मणिपूरसाठी फिझाम सांथोय मिती व लिमाझाम संगकर सिंगने तर पराभूत पंजाबचा एकमेव गोल बदली खेळाडू अभिषेक राट्टूने केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article