102 मजली इमारतीच्या टोकावर उभे राहून सेल्फी
स्टंट करण्याचे शौकीन लोक कधी छोटे-मोठे स्टंट करत नाहीत. आपण असे काही तरी करावे, ज्यामुळे लोकांच्या अंगावर काटा यावा असा त्यांचा प्रयत्न नेहमीच असतो. असे करताना ते स्वत:च्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतात आणि अनेकदा जीवाची जोखीम देखील पत्करतात. इंटरनेटवर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणेच अशक्य वाटू लागले आहे.
हा व्हिडिओ अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डिंगचा आहे. उंच ठिकाणी उभे राहून स्टंट करणाऱ्या युवकाचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना धक्काच बसत आहे. या व्हिडिओत हा युवक एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या छतावर लावण्यात आलेल्या एंटीनाच्या टोकावर उभा असल्याचे दिसून येते, हा 1435 फुटांच्या उंचीवर करण्यात आलेला स्टंट आहे, प्रत्यक्षात हा एक विक्रम असून हे फारच कमी लोकांना करता येण्यासारखे कृत्य आहे.
हा व्हिडिओ हेलिकॉप्टरद्वारे चित्रित करण्यात आला आहे. युवक दोरखंडाला पकडून एंटीनावर उभा आहे अणि निर्भयपणे स्टंट करत आहे. कॅप्शनमध्ये त्याने आपण कुठे उभे आहोत हे सांगितले आहे. सर्वाधिक उंच ठिकाणी पोहोचतात, हेलिकॉप्टर त्याच्या जवळून जाते, हे दृश्य आणखी धोकादायक वाटणारे आहे. हेलिकॉप्टरमधील कॅमेरा जेव्हा उंचीवरून खालच्या दिशेने पाहतो, तेव्हा आसपासच्या इमारती चौकोनी ठोकळ्यांप्रमाणे दिसू लागतात. हा व्हिडिओ इन्स्टा अकौंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत 2 कोटीहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. उंचठिकाणी स्टंट करण्याची त्याची क्षमता पाहून सर्वजण अवाक् झाले आहेत.