Kolhapur News : सोयाबीन खरेदी केंद्राच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांचे गडहिंग्लजमध्ये आंदोलन
सोयाबीन खरेदी केंद्राची मागणी प्रलंबित
गडहिंग्लज : गडहिंग्लज, हलकर्णी येथे दोन ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे, या स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान संघाच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. बुधवारी संघटनेने प्रांता कार्यालयाच्या दारातच सोयाबिनची पोती टाकून घंटा वाजवत शासनाचे लक्ष वेधले.
दरम्यान, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी प्रशासनाची भुमिका सांगत मंत्रालयापर्यंत मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले तरी रात्रभर दारातच आंदोलन सुरू ठेवले आहे.पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता. गडहिंग्लजला सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात बुधवारी दुपारी बैठक होती. यावेळी किसान संघाचे पदाधिकारी आणि स्वाभीमानीचे सचिव राजेंद्र गडुयान्नावर, बाजार समितीचे सचिव बाळासाहेब चव्हाण, संचालक रामदास पाटील, शेतकरी संघाचे तम्मान्ना पाटील, रमेश पाटील आणि कृषी, सहा. निबंधक आणि पणन अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सतत पाठपुरावा करून देखील गडहिंग्लजला केंद्र मंजूर न होता आजरा, कागलला केंद्र मंजूर केल्याने गड्डुयान्नावर यांनी नाराजी व्यक्त केली. या चर्चेत किसान संघाचे राम पाटील, राजगोंडा पाटील आदीनी सहभाग घेतला होता. यावेळी भारतीय किसान संघाचे अमरनाथ घुगरी, बसवराज हंजी, गुरूराज हत्ती, शिवाजी पाटील, उमाशंकर मोहिते, सुनिल कुराडे यांच्यासह स्वाभीमानीचे बसवराज मुत्नाळे, सदाशिव पाटील, धनाजी पाटील, सयाजी पाटील, विक्रांत