For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धर्मगुरूंना दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन व्हावे

11:24 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
धर्मगुरूंना दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन व्हावे
Advertisement

वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांचा भाजपला अहेर

Advertisement

पणजी : निवडणुका येतात व जातात, आता सर्व काही पार पडलेले आहे. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या यश-अपयशावर दीर्घ चर्वण करून धर्मगुरूंना दोष देण्यापेक्षा, प्रत्यक्षात आपण कुठे कमी पडलो याबाबत आत्मचिंतन व्हावे, असे मत वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवारास पराभव पत्करावा लागला. त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देताना, काही धर्मगुऊंच्या हस्तक्षेपामुळे मतांचे ध्रृवीकरण झाल्याचा दावा खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला होता. त्यानंतर पक्षाच्या अन्य काही नेते, पदाधिकाऱ्यांनीही त्यांचीच री ओढत धर्मगुरूंना दोष देणे चालूच ठेवले होते. त्या पार्श्वभूमीवर वाहतूकमंत्र्यांनी सदर मत व्यक्त केले आहे. पुढे बोलताना गुदिन्हो यांनी, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील पराभवाला धर्मगुरूंना दोष देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. याच मुद्यावरून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केलेल्या मताचे गुदिन्हो यांनी समर्थन केले आहे. वारंवार एकाच विषयावर चर्वण करण्यापेक्षा आता, ‘झाले ते झाले’, असे म्हणत तो विषय बंद केला पाहिजे, असे ते म्हणाले. यापुढे लोकांची कामे करण्यास प्राधान्य देऊया, असा सल्लाही त्यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता दिला आहे.

बेदरकारपणे वाहने हाकण्यातून अपघातांच्या संख्येत वाढ

Advertisement

राज्यातील वाढत्या अपघातांबद्दल बोलताना गुदिन्हो यांनी, बेदरकारपणे वाहने हाकण्यात येतात हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. त्या पाठोपाठ मद्यपान करून वाहने चालविण्याच्या प्रकारात झालेल्या वाढीतूनही अपघात घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्लीच्या काही दिवसात मद्यपी चालकांविऊद्ध कारवाईस आरंभ करण्यात आले आहे. त्याशिवाय अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट काढून टाकणे यासारख्या वेगवेगळ्या उपाययोजना सरकारने आखल्या आहेत, असे गुदिन्हो यांनी सांगितले.

दक्षिणेत धर्मगुऊंमुळे ध्रृवीकरण नाही : सुदिन

यापूर्वी याच प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी, दक्षिण गोव्यात धर्मगुऊंमुळे मतांचे ध्रृवीकरण झाले असावे, असे मला तरी वाटत नाही, असे म्हटले होते. याऊलट या मतदारसंघात भाजप उमेदवाराला विजयी करण्यास काही ठिकाणी भाजपचेच कार्यकर्ते कमी पडले, असा दावा त्यांनी केला होता.

Advertisement
Tags :

.