राजकोट येथील घटनेचा निषेध म्हणून कणकवलीत शिवसेनेतर्फे आत्मक्लेष
कणकवली / प्रतिनिधी
मालवण येथील राजकोट येथील घटनेचा निषेध म्हणून कणकवलीत शिवसेनेतर्फे आत्मक्लेष किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध म्हणून कणकवलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे मंगळवारी आत्मक्लेश करण्यात आला. यावेळी पंचायत समिती कार्यालयानजीकच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून पुष्पहार घालून घोषणाही देण्यात आल्या.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड, तेजस राणे, मंगेश सावंत, प्रसाद अंधारी, सी. आर. चव्हाण, कन्हैया पारकर ,महेश कोदे, सचिन आचरेकर, सुदाम तेली आदी उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यात जमीन दोस्त झाला. या घटनेची शिवप्रेमीमध्ये संतापाची भावना आहे. म्हणूनच आज आम्ही शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून नतमस्तक होऊन जिल्हावासियांच्यावतीने माफी मागतो. छत्रपतींनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला 375 वर्षे झाली तरीही तो अभेद्य आहे. मात्र 45 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुतळ्या पडल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. सत्ताधारी टक्केवारीत बरबटलेले आहेत. म्हणूनच आज पुतळ्याच्या घटनेमुळे जनतेला ज्या वेदना झाल्या आहेत, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही दुग्धाभिषेक करून आत्मक्लेश करीत आहोत.