For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेलेनाची प्रिकर बेन्नीसोबत एंगेजमेंट

06:14 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
सेलेनाची प्रिकर बेन्नीसोबत एंगेजमेंट
Advertisement

गायिकेने शेअर केले छायाचित्र

Advertisement

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेज सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. ती अनेकदा स्वत:चा प्रियकर बेन्नी ब्लँकोसोबतची छायाचित्रे शेअर करत असते. अलिकडेच गायिकेने एक छायाचित्र शेअर केले असून ते सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल होत आहे.

हे छायाचित्र पाहिल्यावर सेलेना आणि बेन्नीने एंगेजमेंट केल्याचा कयास चाहते वर्तवू लागले आहेत. याचबरोबर अभिनेत्रीने बेन्नीसोबतच्या एका पोस्टमध्ये अनेक रोमँटिक छायाचित्रेही शेअर केली आहेत.  सेलेना आणि बेन्नी हे मागील काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

Advertisement

सेलेना ही हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गायिका असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सेलेनाचा जगभरात मोठा चाहतावर्ग असून ती सर्वात श्रीमंत गायिका म्हणून ओळखली जाते. सेलेना यापूर्वी पॉप गायक जस्टिन बीबरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु त्यांचे हे नाते फारकाळ चालले नाही. यानंतर सेलेना आता बेन्नीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. बेन्नी हा संगीत क्षेत्रातच कार्यरत असल्याचे समजते.

Advertisement
Tags :

.