For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मेगापोलिस’मध्ये नताली इमॅन्युएल

06:50 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘मेगापोलिस’मध्ये नताली इमॅन्युएल
Advertisement

हॉलिवूड चित्रपट ‘मेगापोलिस’चे नवे पोस्टर समोर आले आहे. याचे दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कोपोला करत आहेत. तेच याचे निर्माते देखील आहेत. चित्रपटात एडम ड्रायवर, जियानकार्लो एस्पोसिटो, नथाली इमॅन्युएल, ऑब्रे प्लाजा यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement

नथाली यापूर्वी गेम ऑफ थ्रोन्स या जगप्रसिद्ध वेबसीरिजमध्ये दिसून आली होती. मेगापोलिस हा चित्रपट चालू महिन्यात प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रान्सिस हे 85 वर्षांचे असल्याने त्यांच्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. स्वप्न पाहणारे आणि बाहेरी लोकांदरम्यान उत्साह आहे, जोखिम पत्करणारे, अजब पद्धतीने काम करणारे आणि विषम परिस्थितीला तोंड देणाऱ्यांसाठी येथे जल्लोष केला जातो. मापदंडांना आव्हान देणारे आणि असामान्य जगाची कल्पना करण्याची साहस दाखविणाऱ्या लोकांसाठी हे जग असल्याचे फ्रान्सिस यांनी नमूद पेले आहे. मेगापोलिस हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पोस्टर पाहून चाहते या चित्रपटासाठी आतुरतेने प्रतीक्षा करत असल्याचे सांगत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.