हेरवाडकर स्कुलच्या विद्यार्थ्यांची निवड
बेळगाव : कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खाते व जिल्हा पंचायत शिक्षण खाते बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेमध्ये हेरवाडकर स्कुलच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. या सर्व खेळाडूंची जिल्हा व विभागीय विध्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आले. या सर्व विजयी विद्यार्थ्यांचे प्राचार्या शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राथमिक विभाग (14 वर्षाखालील विद्यार्थ्यांची नाव़े बुद्धीबळ मुले - गीतेश सागेकर, जिमनॅस्टीक वेदांत पाटील, हॉकी सरवेश डुकरे, सरवेश गोडसे, टेबल टेनिस- आरुष सुतार, बास्केटबॉल-श्रीवास्तव बस्तवाडकर, विराज सालुगडे, कुमार कित्तूर, जतीन पाटील, जलतरण मुलीचा गट- तन्वी कारेकर, माध्यमिक विभाग (17 वर्षाखालील विद्यार्थ्यांचे नावे) टेबल टेनिस, मुले-रणवीर शिंदे, बास्केटबॉल-अरव देसुरकर, स्वयंम नाकाडी, सोहन पुजारी, नेमबाजी, मुली - रित्तू हळभावी, राशी हळभावी, कुस्ती, मुली-कल्याणी आंबोलकर या सर्व खेळाडूना शोभा कुलकर्णी, क्रीडा शिक्षक अनिल गोरे व के. ए. हागीदळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.