अणसूरपाल हायस्कूलच्या संतोष नाईकची राज्यस्तरीय कलाउत्सवसाठी निवड
वेंगुर्ले (वार्ताहर)-
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक विभाग, महाराष्ट्र शासन विद्यमाने दि.२६ सप्टेंबर रोजी, न्यु इंग्लिश स्कूल,कसाल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरिय कला उत्सव २०२४-२५ स्पर्धेत, अणसूर पाल हायस्कूल अणसूरचा इयत्ता नववीतील विद्यार्थी संतोष उत्तम नाईक ( पखवाज वादक) हा इयत्ता ९ वी ते १२ वी या माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून, वादन या कला प्रकारात सर्वोत्कृष्ट वादक ठरला असून, त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरीय कलाउत्सवसाठी निवड झाली आहे.अणसूर पाल हायस्कूलच्यावतीने संतोष नाईक याचा पुष्पगुच्छ देऊन, मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी गौरव केला. यावेळी शिक्षक विजय ठाकर, अक्षता पेडणेकर, चारुता परब व विद्यार्थी - शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे. संतोष नाईक यांस राज्यस्तरीय कलाउत्सवसाठी शालेय परीवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या सुयशाबद्दल संतोष उत्तम नाईक याचे वेंगुर्ला पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे, सेक्रेटरी लिलाधर गावडे, खजिनदार बाळकृष्ण तावडे , शालेय समिती चेअरमन एम. जी. मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे , देवु गावडे व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.