महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साईश्वरी,भूमिकाची निवड

10:20 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : एशियन खुल्या ज्युडो स्पर्धेसाठी डिवायईएसच्या साईश्वरी कोडचवाडकर, भूमिका व्ही. एन. या खेळाडूंसह ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील या कझाकस्थानला रवाना झाल्या आहेत. केरळ येथे झालेल्या साऊथ झोन महिला राष्ट्रीय साखळी स्पर्धेत साईश्वरी कोडचवाडकरने रौप्य पदक, बळ्ळारी येथे झालेल्या स्पर्धेत कास्य पदक, ज्युडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड चाचणीत साईश्वरीने केलेल्या कामगिरीची दखल घेवून तिची निवड करण्यात आली. तर भूमिका व्ही. एन. हिने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले तर केरळ येथे झालेल्या स्पर्धेत रौप्य पदक मिळविले. तिच्या कामगिरीची दखल घेवून एशियन खुल्या ज्युडो स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड केली आहे. या ज्युडो खेळांडू समवेत बेळगाव डीवायईएसची प्रशिक्षिका रोहिणी पाटील हिची संघ व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे. सदर खेळाडू कझाकस्थानला रवाना झाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article