For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी ऋतुजा गुरवची निवड

10:09 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी ऋतुजा गुरवची निवड
Advertisement

11 जणांच्या भारतीय संघात ऋतुजाला स्थान

Advertisement

बेळगाव : उत्तर प्रदेश येथील नोयडा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती निवड चाचणीत खानापूर तालुक्यातील गणेबैलची ऋतुजा संतोष गुरव हिची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे. 15 ते 20 वर्षाखालील मुलींच्या गटात राष्ट्रीय कुस्ती निवड चाचणीत तिने भाग घेतला होता. ऋतुजा गुरवने केलेल्या कामगिरीची दखल घेवून कुस्ती निवड समितीने ऋतुजावर विश्वास ठेवत तिला भारतीय संघात स्थान दिले आहे. 26 जुलै दरम्यान थायलंड येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी 11 जणांच्या भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ती कोल्हापूर येथील भैरवनाथ कुस्ती संकुल पाचगाव येथे सराव करत असून तिचे या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.