For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय संघात ऋतुजा जडेची निवड

11:15 AM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय संघात ऋतुजा जडेची निवड
Advertisement

बेळगाव : परिश्रम, जिद्द आणि चिकाटी असल्यास कोणतीही व्यक्ती आपले ध्येय पूर्ण केल्या शिवाय राहत नाही. कष्टा शिवाय पर्याय नाही, हे आपण जाणतोच. मनात इच्छा आणि ध्येयपूर्ती करण्यासाठी गडहिंग्लज येथील एका तरुणीने अथक कष्ट उपसले. त्यामुळेच तिच्या इजिप्त येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विश्व मॉडर्न पेंटॅथेलॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ऋतुजा राजू जडे असे त्या तरुणीचे नाव आहे. इजिप्त येथे विश्व मॉडर्न पेंटॅथेलॉन स्पर्धेसाठी बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरीयस क्लबची खेळाडू आहे.  ऋतुजाची भारतीय संघात निवड झाल्याने ती इजिप्तला रवाना होणार आहे.

Advertisement

ऋतुजा जडे ही गडहिंग्लजची रहिवाशी आहे. ती गडहिंग्लज ते बेळगावला नियमीतपणे येवून सराव करते. त्यामुळेच तिने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय मॉडर्न पेंटॅथेलॉन स्पर्धेत 800 मी. रन, 100 मी. जलतरण व 800 मी. रन करीत 8.8 मिनिटांत पूर्ण करुन  सुवर्णपदक पटकाविले. तीच्या या कामगिरीची दखल घेवून इजिप्त येथे होणाऱ्या विश्व पेंटाथिऑन स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड करण्यात आली आहे. ऋतुजा ही परिश्रम विद्यालय-गडहिंग्लज येथे शिक्षण घेत असून गडहिंग्लज सारख्या ठिकाणी मोठे जलतरणतलाव नसल्याने तीने बेळगावच्या जेएनएमसी तलावात जलतरणचे धडे घेतले.

ऋतुजा ही शेतकरी कुटुंबातील आहे. आई ललिता व वडील राजू यांनी तिला प्रोत्साहन दिले. अॅथलेटिक प्रशिक्षक बिरंदर अडसुले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवित अनेक पदके मिळविली होती. तिच्या या अथक परिश्रामानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. तीला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ऋतुजासह 26 सहकाऱ्यांसमवेत भारतीय संघ दिल्ली येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून इजिप्तला रवाना होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.