For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कु.रजत तोरसकरची राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

12:13 PM Dec 28, 2023 IST | अनुजा कुडतरकर
कु रजत तोरसकरची राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड
Advertisement

टेबल टेनिसच्या विद्यापीठीय राष्ट्रीय विभागीय स्पर्धांमध्ये कांस्य पदक

Advertisement

खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी

मालवण / प्रतिनिधी
टेबल टेनिस खेळाच्या राष्ट्रीय विभागीय स्पर्धा नुकत्याच भोपाळ येथे पार पडल्या.सदरच्या स्पर्धेमध्ये भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात ,मध्य प्रदेश,राजस्थान या राज्यातील विद्यापीठ यांचा समावेश होता.सदरच्या स्पर्धांमध्ये पश्चिम विभागातील ७२ विद्यापीठांनी भाग घेतला होता.कु.रजत तोरसकर व त्याच्या संघाने सदरच्या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठचे प्रतिनिधित्व केले.अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंतिम चार संघामध्ये स्थान मिळवले.तसेच कुमार रजत याने प्राथमिक फेरीतील सर्व सामने जिंकले आणि आपल्या संघाला अंतिम चार मध्ये स्थान मिळवून दिले.अंतिम चार संघामध्ये झालेल्या राऊंड रॉबिन फेरी चुरशीची झुंज देऊन कास्य पदक मिळवले.यामुळे त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विद्यापीठीय स्पर्धेसाठी झाली आहे.तसेच खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे.

Advertisement

कु.रजत रविकिरण तोरसकर हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स.का पाटील महाविद्यालय याचा माजी विद्यार्थी आहे. तसेच जलदुर्ग इतिहास अभ्यासक टोपीवाला हाय.मधील शिक्षिका सौ .ज्योती बुवा तोरसकर यांचा सुपुत्र आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे मालवण येथील कोरगावकर टेबल टेनिस अकादमीचे संस्थापक आणि त्याचे मार्गदर्शक श्री.विष्णू कोरगावकर तसेच त्याचे प्रशिक्षक डॉ.राहुल पंत वालावलकर ,सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघटनेचे श्री.हेमंत वालकर आनि इतर सदस्यांनी अभिनंदन केले आहे. . रजत तोरसकरच्या यशामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. आणि टेबल टेनिस खेळाचा जिल्ह्यात प्रचार प्रसार होईल . असे मत व्यक्त केले आहे. अ.शी.दे टोपीवाला हायस्कूल आणि स.का पाटील महाविद्यायच्या शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Tags :

.