For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राची दळवी यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

02:41 PM Jan 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
प्राची दळवी यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
Advertisement

सावंतवाडी -
सन -2023 -24 च्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जि . प शाळा नं. 5 माजगावच्या शिक्षिका श्रीम. प्राची प्रसाद दळवी यांच्या नवोपक्रमाला जिल्हास्तर टप्प्यात चतुर्थ क्रमांक प्राप्त होऊन त्यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नवोपक्रमशील शिक्षक ,अधिकारी यांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन केले जाते .ही स्पर्धा पाच गटात घेण्यात येते . यामध्ये पूर्वप्राथमिक ,उच्च प्राथमिक, विषय सहाय्यक, विषय साधनव्यक्ती , अध्यापकाचार्य या गटांचा सामावेश आहे .

Advertisement

श्रीम. प्राची दळवी यांनी 'निसर्गरंग उधळूया , पर्यावरण जागृती करू या ' हा नवोपक्रम सादर केला होता त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य श्री. सुशील शिवलकर जेष्ठ अधिव्याख्याता श्री. कांबळे ,श्री. जाधव व डॉ. आचरेकर , सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी श्रीम कल्पना बोडके , विस्तार अधिकारी श्रीम. दुर्वा साळगांवकर ,केंद्रप्रमुख माजगाव श्री . नरेंद्र सावंत , श्री . प्रमोद पावसकर शा .व्य .स अध्यक्ष , उपाध्यक्ष , सहकारी शिक्षक , पालक , शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.