For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओम, शुभम, संचिताची निवड

08:57 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओम  शुभम  संचिताची निवड
Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पॅरा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबचे पॅरा जलतरणपटू 8 सुवर्ण, 1 रौप्यपदक पटकावित राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. बसवनगुडी जलतरण तलावात झालेल्या या स्पर्धेत ओम जुवळीने 2 सुवर्ण, 1 रौप्य, शुभम कांबळेने 3 सुवर्ण व संचिता सातपुतेने 3 सुवर्णपदके पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य जलतरण संघात स्थान मिळविले आहे. 19 ते 23 ऑक्टोबर रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत भाग घेण्यासाठी हे खेळाडू शनिवारी गोव्याला रवाना होणार आहेत. वरील सर्व जलतरणपटूना आबा व हिंद क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, रणजीत पाटील, विशाल वेसने यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते.

Advertisement

Advertisement
Tags :

.