महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आशियाई खुल्या ज्युडो स्पर्धेसाठी मराठा मंडळच्या खेळाडुंची निवड

11:11 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मराठा मंडळ महाविद्यालयच्या दोन ज्युडोपटु साईश्वरी गंगाराम कोडूचवाडकर व  भूमिका व्ही. एन. यांची एशीयन स्पर्धेसाठी निवड झाल्याने खाश गौरव करण्यात आला. बेळगाव येथील मराठा मंडळ कला वाणिज्य विज्ञान व गृहविज्ञान आणि स्नातकोत्तर एम. कॉम आणि एम.एससी रसायनशास्त्र पदवी महाविद्यालय बेळगाव येथील कला शाखेची द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी  भूमिका व्ही. एन. हिने केरळा अस्मिता डी. वाय.ई.एस. यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीयस्तरावर झालेल्या ज्युडो लीग नॅशनल स्पर्धेत ज्युनिअर गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक आणि 25 हजार ऊपयांची मानकरी ठरली.

Advertisement

तर वाणिज्य शाखेच्या प्रथम  वर्षाची विद्यार्थिनी राधिका सुनील डुकरे हिने ज्युनिअर गटामध्ये तिसरा क्रमांक  पटकावत कास्य पदक आणि आठ हजार ऊपयांची मानकरी ठरली. येत्या 11 आक्टोबरला आंतरराष्ट्रीय स्तरावर कजाकिस्तान येथील आखताऊ शहारामध्ये होणाऱ्या आशियाई खुल्या ज्युडो स्पर्धेसाठी भूमिका  व्ही. एन.  हिची 78.किलो वजन  सीनियर गटामध्ये आणि कला शाखेची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी साईश्वरी गंगाराम कोडूचवाडकर-78 किलो वजन ज्युनियर गटामध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी  निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मराठा मंडळ  संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजु,  प्राचार्य डॉ. एच.जे. मोळेराखी,  क्रीडा शिक्षक प्रा. राजू हट्टी व प्राध्यापक वर्गाने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article