मंगेश जोशी ,वैदेही रानडे यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड
आयएएस पदी पदोन्नती मिळालेल्या दोन्ही अधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गात केले होते काम
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी आणि तत्कालीन उपविभागीय अधिकारी वैदेही रानडे या दोन्ही अधिकाऱ्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे . भारत सरकारकडून 23 आयएएस पदोन्नती देण्यात आली असून लवकरच ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होणार आहेत . मंगेश जोशी हे सध्या पुणे- यशदा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी कार्यरत आहेत. त्यापुर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी होते. तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदीही सिंधुदुर्ग मध्ये उत्कृष्ट काम केले होते. सिंधुदुर्गनगरी प्राधिकारणचा कार्यभारही संभाळला होता. तर वैदही मनोज रानडे या ठाणे जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांनी सिंधुदुर्गात कुडाळ उपविभागीय अधिकारी पदावर काम केले होते. दोन्ही अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल आज सोमवारी भारत सरकारने आदेश काढले आहेत. लवकरच त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा अन्य पदावर नियुक्ती मिळणार आहे. मंगेश जोशी व वैदेही रानडे यांची आयएएस पदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.