भारत-अमेरिका मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीराची निवड
ग्रुप पॅप्टन शुभांशू शुक्ला यांना संधी : प्रशांत बालकृष्णन नायर बॅकअप पायलट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने इंडो-युएस स्पेस मिशनसाठी आपल्या मुख्य अंतराळवीराची निवड केली आहे. भारताकडून ग्रुप पॅप्टन शुभांशू शुक्ला या मिशनचे मुख्य अंतराळवीर असतील. तर ग्रुप पॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे बॅकअप मिशन पायलट असतील. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) आपल्या अंतराळवीर-नियुक्तांपैकी सर्वात तऊण व्यक्तीची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) आगामी भारत-अमेरिका मोहिमेवर उ•ाण करण्यासाठी मुख्य अंतराळवीर म्हणून निवड केली आहे. शुक्ला यांना भारतीय हवाई दलात नुकतीच बढती मिळाली आहे.
अमेरिकन अवकाश यंत्रणा ‘नासा’ भारताचे ग्रुप पॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवणार असल्याचे इस्रोने शुक्रवारी जाहीर केले. इस्रोच्या मानव अंतराळ उ•ाण केंद्राने (एचएसएफसी) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील आगामी एक्सिओम-4 मिशनसाठी अमेरिकेतील ‘एक्सिओम’ अवकाश केंद्रासोबत स्पेस फ्लाईट करार (एसएफए) केला आहे. यात दोन भारतीय मुख्य आणि बॅकअप मिशन पायलट असतील. निवेदनानुसार, ग्रुप पॅप्टन शुक्ला हे प्राथमिक मिशन पायलट असतील, तर भारतीय हवाई दलाचे दुसरे अधिकारी, ग्रुप पॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे बॅकअप मिशन पायलट असतील.
कोण आहेत ग्रुप पॅप्टन शुभांशू शुक्ला?
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे जन्मलेल्या ग्रुप पॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये कठोर आणि प्रदीर्घ लष्करी प्रशिक्षण घेतल्यानंतर जवळजवळ 18 वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलात आपली सेवा सुरू केली. कारगिल युद्धादरम्यान भारतीय जवानांच्या शौर्य आणि बलिदानाच्या शौर्यगाथा वाचून त्यांना सैन्यदलात सामील होण्याची प्रेरणा मिळाली. 1999 मध्ये कारगिल युद्ध सुरू झाले तेव्हा ते केवळ 14 वर्षांचे होते. त्यावेळी पाकिस्तानी घुसखोरांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय चौक्मयांवर अतिक्रमण केले होते. याचदरम्यान त्यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या सेवेत जाण्यासाठी धडपड सुरू केली होती. त्याच अनुषंगाने आतापर्यंत त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली आहे.