For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोल्ड मेडलनंतर डायमंड रिंग

06:55 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोल्ड मेडलनंतर डायमंड रिंग
Advertisement

बॅडमिंटन कोर्टवर थेट गर्लफ्रेंडला प्रपोज, चीनचा बॅडमिंटनपटू लियू चेन व हुआंग क्योंगची अजब गजब प्रेमकहाणी

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

2024 ऑलिम्पिक गेम्स पॅरिसमध्ये होत आहेत. पॅरिसला ‘प्रेमाचं शहर’ असे म्हटले जाते. अनेकजण खास या शहरात येऊन आपल्या जोडीदाराकडे प्रेम व्यक्त करतात. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये असेच एक दृष्य पहायला मिळाले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेती चीनची बॅडमिंटनपटू हुआंग किओंगला तिचा प्रियकर लियू यू चेनने प्रपोज केलं, जे आता चर्चेचा विषय ठरले आहे. शुक्रवारी ला चॅपेल एरिना येथे मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यानंतर, लियू चेनने त्याची सुवर्णपदक विजेती गर्लफ्रेंड हुआंग किओंगला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातली. हा चिनी जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Advertisement

चिनी बॅडमिंटन स्टार हुआंग किओंगने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. या सुवर्णपदकासह तिला तिच्या आयुष्याचा जोडीदारही भेटला. शुक्रवारी 30 वर्षीय हुआंगने झेंग सी वेईसोबत खेळत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. तिचे हे पहिले ऑलिम्पिक सुवर्ण होते. मिश्र दुहेरीचा पदक सोहळा संपल्यानंतर चीनकडून पुरुष दुहेरीत खेळणाऱ्या लियू चेनने हुआंगसमोर गुडघे टेकले. यावेळी लियू चेनने खिशातून अंगठी काढली आणि हुआंगला लग्नासाठी प्रपोज केले. यादरम्यान हुआंगच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि डोळ्यातही अश्रू तरळले होते. तिने चेनला होकार दिला, यानंतर ला चॅपेल एरिनामध्ये उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

प्रतिक्रिया

पॅरिसमध्ये डायमंड रिंग मिळण्याची अपेक्षा नव्हती. माझे संपूर्ण लक्ष खेळाच्या तयारीवर केंद्रित केले होते. हा एक अविस्मरणीय असा प्रसंग आहे, तो मी कधीच विसरु शकणार नाही. मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाही कारण मी खूप आनंदी आहे.

-हुआंग किओंग

Advertisement

.