राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कराटेपटूंची निवड
10:18 AM Sep 14, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेतर्फे दहा प्रशिक्षक जिल्हा कराटेपटूंची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. 14 वर्षाच्या खालील मुले व मुलींची कराटे निवड चाचणी शानबाग हॉल कॅम्प झाली. या स्पर्धेसाठी बेळगाव जिह्यातील 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा बेळगाव जिल्हा स्पोर्टस् कराटे संघटनेतर्फे आयोजित केले होते. 14 वर्षाच्या खालील मुलांचे व मुलींची राज्य कराटे स्पर्धेसाठी सुवर्णपदक विजेत्या कराटेपटूंची निवडणूक करण्यात आली. स्पर्धेला पंच म्हणून विठ्ठल बोजगार, प्रभाकर लेकर, अक्षय परमोजी, हरी सोनार, निलेश गोरखा यांनी काम पाहिले. प्रमुख पाहुणे म्हणून गजेंद्र काकतीकर, रमेश आलगुडगेकर व जितेंद्र काकतीकर यांच्या हस्ते कराटे स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ही निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी जितेंद्र काकतीकर यांनी परिश्रम घेतले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article