बालिका आदर्श हॅन्डबॉल संघाची निवड
बेळगाव : धारवाड येथे सार्वजनिक शिक्षण खाते बेळगांव विभागच्यावतीने हँडबॉल विभागीय स्पर्धेत प्राथमिक मुलींच्या गटात अंतिम सामन्यात बालिका आदर्शने धारवाडचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तर माध्यमिक गटात तिसरा क्रमांक समाधान मानावे लागले. हा संघ प्राथमिक गट राज्य स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. धारवाड घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्राथमिक गटात उपांत्य फेरीच्या सामन्यात बलिका आदर्शने चिक्कोडी जिल्हा संघाचा 11-0 अशा गोल पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांनी धारवाडचा 11-1 असा पराभव करत अजिंक्यपद मिळविले. या संघात शिवानी शेलार, समृद्धी पाटील, आदिती कोरे, सेजल धामणेकर, ऋतुजा जाधव, श्रेया मजुकर, श्रेया खन्नुकर, श्रद्धा कणबरकर, अंकिता आयरेकर यांचा समावेश होता. शिवानी शेलार हिने सर्वाधिक 5 तर आदिती कोरेने 2, सेजल धामणेकरने 3 तर समृद्धीने 1 गोल केला. चालु महिन्यात मंड्या येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी बेळगाव जिह्याचा संघ म्हणून बालिका आदर्श प्रतिनिधित्व करणार आहे. खेळांडूना शाळेचे चेअरमन जी. एन. फडके, आनंद गाडगीळ, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व मंजुनाथ गोल्याळी यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.