For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी गौरव नाईक यांची निवड

04:36 PM Jan 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी गौरव नाईक यांची निवड

वेंगुर्ले/ प्रतिनिधी

Advertisement

सन 2023-24 च्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वेंगुर्ले तालुक्यातील मठ जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.1 चे पदवीधर शिक्षक गौरव शंकर नाईक यांनी सादर केलेल्या यात्रा गणिताची विभाज्यतेच्या कसोट्यांची या शैक्षणिक प्रतिकृतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. या प्रतिकृतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. गौरव नाईक यांनी बनवलेली ही शैक्षणिक प्रतिकृती राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सदर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कुडाळ तालुक्यातील पणदूर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते.

शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज्ञान संस्था रवीनगर, नागपूर यांच्यातर्फे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. तालुक्यातील सर्व शाळा या विज्ञान प्रदर्शनात भाग घेतात व तालुक्यातून एक प्रतिकृती जिल्हास्तरावर निवडली जाते. जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्यातून निवडलेल्या प्रतिकृती मधून परीक्षण करून एका प्रतिकृतीची राज्यस्तरासाठी निवड केली जाते. असे या विज्ञान प्रदर्शनाचे स्वरूप असते. आमदार नाईक यांच्या हस्ते गौरव नाईक याचा सन्मान करण्यात आला.त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर,उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी (पं. स. ) संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, केंद्रप्रमुख श्री. महादेव आव्हाड, मुख्याध्यापक अजित तांबे, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.