आंतरराष्ट्रीय गणित व मानसिक अंकगणित स्पर्धेसाठी चिराग चितारीची निवड
04:40 PM Aug 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
येथील एड्युस्मार्ट इंक ॲबॅकस सेंटरच्या चिराग राजेश चितारी याची हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित व मानसिक अंकगणित स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. ही स्पर्धा हाँगकाँगमध्ये ४ ऑगस्टला होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतातून एकुण ४ मुलांची निवड झाली असून जगभरातून विविध देशातील २ हजार मुले या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. चिरागला एड्युस्मार्ट सेंटरच्या संचालिका सौ. सपना पिंगे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल चिरागचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Advertisement
Advertisement