महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बालिका आदर्शच्या मुष्टियोद्ध्यांची निवड

10:46 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव यांच्यावतीने घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाच्या बॉक्सिंगपटूंनी यश संपादन केले. जिल्हा क्रीडावस्तीगृह बेळगाव घेण्यात आलेल्या बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थिनी शिवानी धुडूम 58 ते 60 वजनी गटात सुवर्ण, स्वानंदी पावले 48 ते 50 वजनी गटात सुवर्ण, अपूर्वा खंडागळे 70 ते 72 वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले. या सर्वांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या प्रसंगी अर्जुन अवॉर्ड विजेते मुकुंद किल्लेकर, बालिका आदर्श शाळेचे शारिरीक शिक्षक उमेश बेळगुंदकर उपस्थित होते. या सर्वांना शाळेचे चेअरमन जी. एन. फडके, उपसचिव आनंद गाडगीळ, मुख्याध्यापक एन. ओ. डोनकरी व मंजुनाथ गोळीहल्ली यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article