महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आबा- हिंद क्लबच्या जलतरणपटूंची निवड

10:29 AM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रीय एसजीएफआय स्पर्धा

Advertisement

बेळगाव : बेंगलोर येथील कर्नाटक राज्य शैक्षणिक खात्याच्या राज्य पातळीवरील शालेय 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुला मुलींच्या जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबच्या जलतरण पटूनी उत्कृष्ट कामगिरी करताना 17 सुवर्ण 19 रौप्य व 13 कांस्यपदकासह एकुण 49 पदके मिळवित घवघवीत यश संपादन केले आहे.

Advertisement

बसवानगुडी जलतरण तलावात झालेल्या जलतरणपटुनी केलेली कामगिरी पुढील प्रमाणे :- स्वरूप धनुचे (सेंट पॉल्स) 4 सुवर्ण एक रौप्य, तनुज सिंग (सेंट मेरीज)  4 सुवर्ण एक रौप्य,  नील मोहिते (सेंट पॉल्स) 2 सुवर्ण, ध्रुवरेड्डी मुल्लूर (सेंट मेरीज) 2 रेप्य पदक पटकाविले. 17 वर्षाखालील मुली विभागात- वेदा खानोलकर (चिटणीस) 2 सुवर्ण एक रौप्य, 2 कास्य, प्रणाली जाधव (सेंट जोसेफ) 2 रौप्य, एक कास्य, अनन्या रामकृष्ण (डीपी) 2 रौप्य, 2 कास्य, प्रिशा पटेल (डीपी) एक रौप्य, 2 कास्य, किमया गायकवाड (डी पी) एक रौप्य, मनस्वी मुचंडी (सेंट मेरी) 2 रौप्य, विजयलक्ष्मी पुजारी (मॉडेल स्कुल) एक कास्य, प्राजक्ता प्रभू (केएलएस) एक कास्य पदक पटकाविले.

14 वर्षाखालील मुले-अमोघ रामकृष्ण (सेंट पॉल्स) 2 रौप्य, युवराज मोहनगेकर (सेंट झेवियर्स) 3 सुवर्ण, वरद खानोलकर (चिटणीस) 2 रौप्य, 14 वर्षाखालील मुली2- वैशाली घाटेगस्ती (डीपी) 2 सुवर्ण, एक रौप्य, 2 कांस्य, तन्वी कारेकर  (हेरवाडकर) 2 रौप्य पदक पटकाविले. स्वरूप धनुचे, तनुज सिंग, नील मोहिते, ध्रुवरेड्डी मुल्लूर, युवराज मोहनगेकर, अमोघ रामकृष्ण, वरद खानोलकर, वेदा खानोलकर, प्रणाली जाधव, अनन्या रामकृष्ण, प्रिशा पटेल, किमया गायकवाड, वैशाली घाटेगस्ती, तन्वी कारेकर या 14 मुला मुलींची दि. 24 ते 30 नोव्हेंबर रोजी राजकोट गुजरात येथे होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली आहे.

वरील सर्व जलतरणपटूंना आबा व हिंद क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, शिवराज मोहिते, रणजीत पाटील, सतीश धनुचे, संदीप मोहिते यांचे बहुमोल मार्गदर्शन तर क्लबचे पदाधिकारी मोहन सप्रे, शितल हुलबत्ते, अरविंद संगोळी, राजू मुंदडा, राजू गडकरी, सुनील हनमण्णवर, शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभते .

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article