बालिका आदर्शच्या 8 खेळाडूंची निवड
11:24 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव शहर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक आणि माध्यमिक गटाच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाच्या मुलींनी उत्तम कामगिरी केली. प्राथमिक गटात समिक्षा करतसकरने 600 मी. द्वितीय क्रमांक, तर ऋतुजा जाधव, समिक्षा करतसकर, प्रांजल धुडूम, श्रेया खन्नूकर यांनी 100 व 400 मी. रिलेमध्ये विजेतेपद मिळविले. माध्यमिक गटातमध्ये शिवानी शेलारने 800 मी. 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम, साक्षी खांदारने 100, 400, 200 मी धावण्याच्या शर्यतीत प्रथम, ऋतुजा सुतारने 100 मी. अडथळा शर्यत, उंचउडी, तिहेरी उडी प्रथम, प्रतिज्ञा मोहीतेने 400 मी. अडथळा व तिहेरी उडी द्वितीय, श्र्रध्दा कणबरकरने 3000 मी. चालणे तृतीय, साक्षी खंदारे, ऋतुजा सुतार, शिवानी शेलार, प्रतिज्ञा मोहिते यांनी रिलेमध्ये प्रथम स्थान मिळविले.
Advertisement
Advertisement