For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ताराराणी कॉलेजच्या 15 विद्यार्थिनींची निवड

10:33 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
ताराराणी कॉलेजच्या 15 विद्यार्थिनींची निवड
Advertisement

खानापूर : येथील मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी सांघिक स्पर्धा रामदुर्ग तालुका येथे पार पडल्या. या स्पर्धेत मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूरच्या विद्यार्थिनींनी मुलीच्या कबड्डी स्पर्धेत यश मिळवले व आरती तोरगल, साधना होसुरकर, संगीता होसुरकर, सोनाली धबाले या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

Advertisement

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा खानापूर येथे घेण्यात आल्या. रोशनी कंग्राळकर, माधुरी मेलगे, निलम कक्केरीकर या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत निवड करण्यात आली. दीक्षा शिरोडकर, मनीषा बरूकर, सोनिया घाडी या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय टेनिस व्हॉलिबॉल संघात निवड करण्यात आली. बेळगाव जिल्हास्तरीय टेनी क्वाईट सांघिक स्पर्धा खानापूर येथे घेण्यात आल्या. लक्ष्मी गोरल मालाश्री पाटील, संगीता होसुरकर, प्राजक्ता निडगलकर यांची राज्यस्तरीय टेनी क्वाईट सांघिक स्पर्धेत निवड करण्यात आली.

वैयक्तिक खेळात साधना होसुरकर या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला व तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचे मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांनी विशेष कौतुक केले असून राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच संस्थेचे संचालक परशराम गुरव, शिवाजीराव पाटील यांनी विशेष प्रोत्साहन दिले. या सर्व विजयी खेळाडूंना ताराराणी कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील, ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव व मुख्य प्रशिक्षक भरमाणी पाटील, भीमसेन व मंगला देसाई यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :

.