कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेजल भावीची हॉकी संघात निवड

10:55 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जी. जी. चिटणीस शाळेची विद्यार्थिनी सेजल भावीची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी कर्नाटक संघामध्ये निवड झाली आहे. याबद्दल शाळेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष अॅड. चंद्रहास अणवेकर, मुख्याध्यापिका डॉ. नवीना शेट्टीगार,क्रीडाशिक्षक जयसिंग धनाजी यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. हासन येथे नुकत्याच  झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये माध्यमिक मुलींच्या गटामधून बेळगाव विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. या स्पर्धेत बेळगाव विभागाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या संघामध्ये जी. जी. चिटणीस शाळेचे हॉकीपटू वैष्णवी इटनाळ, सेजल भावी, श्रेया गोलीहाळी, महेक बिस्ती, वैष्णवी नाईक यांचा समावेश होता. झारखंडमधील रांची येथे  27 ते  31 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ती रवाना होणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article