महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

निश्चल बुद्धीचा साधक ईश्वराशी जोडला जातो

06:03 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

निरपेक्षपणे कर्म करुन ईश्वराला अर्पण करावे. कुणाकडे काही मागू नये आदि गोष्टी कळतात पण वळत नाहीत अशी माणसाची अवस्था असते. कितीही नाही म्हंटले तरी माणसाला सकाम कर्म करण्याची सवय यापूर्वीच्या अनेक जन्मात जडलेली असते. बाप्पा म्हणाले, राजा ही सवय मोडण्यासाठी कर्मे करताना ती मला अर्पण करायची सवय लावून घे. कर्मे मला अर्पण करायची म्हणजे कर्माच्या सुरवातीला करत असताना अधूनमधून व कर्माच्या शेवटी माझं स्मरण कर. असं सातत्याने करत गेलास की, हळूहळू मनाला तशी सवय लागेल आणि ते निमूटपणे तू सांगशील तसे ऐकेल. पुढेपुढे तर मन तुझ्या नकळत ही गोष्ट करू लागेल आणि त्यातून तुला मिळणारा आनंद अवर्णनीय असेल.

Advertisement

हा अवर्णनीय आनंद तू एकदा घेतलास की तो वारंवार मिळावा असे तुला वाटू लागेल आणि त्यापुढे यापूर्वी तुला मोहात पडणाऱ्या सकाम कर्मांचे महत्त्व वाटणार नाही. सकाम कर्माचे तात्पुरते महत्त्व लक्षात आल्यावर तुझे मन सकाम कर्मे करण्यापासून दूर होऊन निष्काम कर्मातून मिळणाऱ्या आनंदाचा ठेवा मिळवण्यासाठी आतुर होईल. सकाम कर्मे करून मिळणारे फळ हे तात्पुरते असल्याने ते तेव्हढ्यापुरते आनंद देते हे समजल्यावर सकाम कर्मे करण्याबाबतचा फोलपणा लक्षात येईल. त्याचबरोबर कर्मफळाबाबत मनावर असलेलं अज्ञान झटकलं जाईल आणि आपोआपच मन शांत होईल.

परिणामी आहे या परिस्थितीत समाधानी रहावं हा विचार मनावर ठसेल आणि मन प्रगल्भ होऊन शांत होऊन वैराग्य येईल. वैराग्य म्हणजे अमुक एक घडावं किंवा अमुक एक घडू नये असे न वाटणे. असे झाले की मनुष्याचे मन शांत आणि स्वस्थ होते. त्याला सतत प्रसन्न वाटू लागते. आपल्याला ईश्वराने दिलेले काम केले की आपण निर्धास्त झालो असे वाटल्याने त्याला काय प्राप्ती होईल ते बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

त्रयीविप्रतिपन्नस्य स्थाणुत्वं यास्यते यदा ।

परात्मन्यचला बुद्धिस्तदासौ योगमाप्नुयात् ।।52।।

अर्थ-तीन वेदांनी परस्परविसंगत सांगितलेल्या कर्माचे ठिकाणी जेंव्हा निश्चलत्व येईल व परमात्म्याचे ठिकाणी बुद्धी निश्चल होईल तेव्हा योगाची प्राप्ती होईल.

विवरण-वेदांनी सांगितलेली सकाम कर्मे करून पृथ्वीवरील व स्वर्गसुखाची अपेक्षा करणे कसं चुकीचे आहे हे लक्षात आलेल्या माणसाने सकाम कर्मे करायची नाहीत असं ठरवलं की, त्याला अमुक हवं तमुक नको असं वाटायचं बंद होईल. म्हणजेच त्याला वैराग्य

येईल.

वैराग्य आलेल्या माणसाला नव्याने काहीही मिळवायचं नसल्याने, तो आहे त्यात समाधानी असतो. सामान्य मनुष्य सतत काही ना काही मिळवण्यासाठी निरनिराळे संकल्प करत असतो. पण आहे त्या परिस्थितीत समाधानी असलेल्या साधकाच्या मनात कोणतेही संकल्प येत नाहीत. साहजिकच त्याच्या मनात संकल्पांच्या पूर्तीसाठी अमुक एक करावं किंवा तमुक करू नये असे विकल्पही येत नाहीत. ह्या संकल्प आणि विकल्प यांच्यावर खल करायचं काम बुद्धीचं आहे म्हणून भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण इंद्रिये, मन, बुद्धी आणि प्रभू हे एकापेक्षा एक वरचढ असतात असे सांगतात. ते

म्हणतात,

इंद्रिये बोलली थोर, मन त्याहून थोर ते भगवद

बुद्धी थोर मनाहूनी थोर तिहुनी तो प्रभू । 3.42।

समाधानी माणसाला इच्छा होत नसल्याने त्याच्या मनाला आवर बसून ते शांत होतं. शांत झालेलं मन इंद्रियांवर काबू मिळवतं. वैराग्य आल्यामुळे निरिच्छ मनात संकल्प विकल्प उठत नसल्याने बुद्धी स्थिर होऊन ईश्वरचरणी लीन होते आणि निरपेक्ष कर्मे करण्याच्या दृष्टीने मनाला इंद्रियांना मार्गदर्शन करण्यास सांगते. त्यामुळे मनुष्याला कर्मयोगाची म्हणजे निरपेक्ष कर्मे करण्याची हातोटी प्राप्त होते.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social-media
Next Article