मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सुरक्षेत त्रुटी
अचानक एक तरुण व्यासपीठावर घुसल्याचा प्रकार
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर एक तरुण घुसल्याची घटना विधानसौध समोर रविवारी घडली. मुख्यमंत्री सहभागी झालेल्या कार्यक्रमात सुरक्षेचा अभाव दिसून आला आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि आमदार व्यासपीठावर उपस्थित असताना एका तऊणाने अचानक व्यासपीठाकडे धाव घेत व्यासपीठावर चढण्यास सुऊवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले. रविवारी विधानसौधसमोर लोकशाही दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चालना दिली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या व्यासपीठावर एका तऊणाने गोंधळ घातला आहे. लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात मंत्री एच. सी. महादेवप्पा बोलत होते. यावेळी एक तऊण अचानक धावत जाऊन व्यासपीठावर चढला. दरम्यान, त्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर शाल फेकली. तात्काळ सतर्क झालेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन स्थानकात चौकशी चालविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सुरक्षेची मोठी त्रुटी दिसून आली आहे. सदर युवक कोण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. तो मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे चाहते असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.