For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुरक्षा दलांना मिळणार 156 लढाऊ हेलिकॉप्टर

06:40 AM Mar 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
सुरक्षा दलांना मिळणार 156 लढाऊ हेलिकॉप्टर
Advertisement

सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची कराराला मान्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) 156 हलके लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कराराला सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर आहे. हेलिकॉप्टरची निर्मिती कर्नाटकातील बेंगळूर आणि तुमकूर येथील त्यांच्या प्रकल्पांमध्ये केली जाणार आहे.

Advertisement

संरक्षण सूत्रांनुसार, 156 हलके लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलात विभागले जातील. यापैकी 90 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराला आणि उर्वरित भारतीय हवाई दलाला देण्यात येतील. या हालचालीमुळे चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील कारवाया अधिक मजबूत होण्यास मदत होईल. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत मेक इन इंडियाद्वारे संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्याच्या आपल्या हेतूवर सरकार भर देत आहे. त्याअंतर्गत सरकारने स्वदेशी संरक्षण प्रणालींसाठी सर्वात मोठी ऑर्डर दिली आहे.

हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर ‘प्रचंड’च्या समावेशामुळे विशेषत: उंचावरील भागात सैन्याची मोहीम क्षमता आणखी बळकट होईल. सध्या, भारतीय हवाई दल राजस्थानमधील जोधपूर येथे 10 हलके लढाऊ हेलिकॉप्टर वापरत आहे, तर भारतीय लष्कर आसाममधील मिसामारी येथे 5 हलके लढाऊ हेलिकॉप्टर वापरत आहे. संरक्षण मंत्रालयाने जून 2024 मध्ये 156 हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला प्रस्तावाची विनंती जारी केली होती. 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान संरक्षण मंत्रालयाला पहिल्यांदा उंचावरील भागात काम करण्यासाठी स्टेल्थ हेलिकॉप्टरची आवश्यकता जाणवली होती.

Advertisement
Tags :

.