कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुरक्षा दलांना यश, घातपाताचा कट उधळला

10:05 AM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चार राज्यांमधून पाच दहशतवाद्यांना अटक : सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी हँडलर्सच्या होते संपकृ : आयईडी स्फोटाचा होता कट

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली पोलिसांची विशेष शाखा आणि केंद्रीय यंत्रणांनी दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड करत मोठ्या हल्ल्याचा कट उधळला आहे. दिल्ली, झारखंड, तेलंगणा आणि मध्यप्रदेशातून 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रमोद सिंह कुशवाह यांनी गुरुवारी यासंबंधी माहिती दिली आहे. दिल्लीत केमिकल बॉम्बद्वारे हल्ला करण्याचा कट हे दहशतवादी रचत होते.

झारखंडमधून 2, दिल्लीतून 1, तेलंगणा आणि मध्यप्रदेशातून प्रत्येकी एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले. या दहशतवाद्यांकडून सल्फर पावडर, सल्फ्यूरिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड, सोडियम बायकार्बोनेट, बॉल बेयरिंग्स, सेफ्टी ग्लास, रेस्पिरेट्री मास्क, सर्किट वायर, मदर बोर्ड, लॅपटॉप आणि शस्त्रास्त्रs हस्तगत करण्यात आली आहेत. हे दहशतवादी सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते. पाकिस्तानी हँडलर्स या दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतींबद्दल माहिती पुरवत होता. आफताब या दहशतवाद्याला शस्त्र सोपविण्यात आले होते, जे घेत तो दिल्लीत पोहोचला होता.

मॉड्यूलच्या प्रमुखाचे नाव गजवा

हे दहशतवादी पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते. पाकिस्तानी हँडलरने या दहशतवाद्यांना ‘खिलाफत मॉडेल’ अवलंबिण्याचा निर्देश दिला होता. हे दहशतवादी हल्ल्यांसाठी एका ठिकाणाची निवड करणार होते तसेच या दहशतवाद्यांना स्वत:सोबत आणखी लोकांना जोडण्याचे काम सोपविण्यात आले होते. दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख दानिश होता, परंतु त्याला गजवा नाव देण्यात आले होते. तर त्याचे कोड नेनम सीईओ होते. हे दहशतवादी 20-25 वयोगटातील आहेत, दानिश हा मूळचा झारखंडचा असून त्यानेच उर्वरित आरोपींना दहशतवादाशी जोडले होते.

टार्गेटेड किलिंग

तर आफताब अंसारी हा मुंबईचा रहिवासी असून तो मांसविक्रीचे काम करायचा. आफताबला टार्गेटेड किलिंग्जचे काम सोपविण्यात आले होते. आफताब दिल्लीतून परत जात असताना त्याला आणि त्याचा सहकारी सुफियानला अटक करण्यात आली. तर त्याचा आणखी एक साथीदार  कामरान कुरैशीला मध्यप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले. तर 5 वा दहशतवादी आदमी हुजेफाला तेलंगणाच्या निजामाबाद येथून अटक करण्यात आली.

सोशल मीडियाद्वारे युवांची भरती

हे दहशतवादी भारतात मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत होते. सोशल मीडियाचा वापर ते भारतातील युवांना कट्टरवादी करणे आणि त्यांना दहशतवादी नेटवर्कमध्ये भरतीसाठी करण्यासाठी करत होते. एखाद्या जागेवर कब्जा करत ‘खिलाफत’ सुरू करण्याचा त्यांचा कट होता. तर तपास यंत्रणा आता त्यांचे टार्गेट आणि नेटवर्कचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

केमिकल बॉम्बचा होता कट

दिल्लीतून आफताब आणि सुफियान यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याजवळून आयईडी निर्मितीचे साहित्य हस्तगत झाले. तर झारखंडच्या रांची येथून ताब्यात घेतलेल्या दानिशच्या ठिकाणावरून केमिकल बॉम्ब तयार करण्याचे साहित्य मिळाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article